esakal | धनगरांची फसवणूक नेते की सरकार करते? कार्यकर्त्यांची भावना
sakal

बोलून बातमी शोधा

धनगरांची फसवणूक नेते की सरकार करते? कार्यकर्त्यांची भावना

समाजाच्या जीवन-मरणाचा प्रश्न असतानाही सतत राजकारण केले जात आहे. भीक दिल्यासारखा सत्तेचा तुकडा राजकीय पक्ष देतात. अनेक नेते काही या प्रश्नावर एकत्र येत नाहीत.

धनगरांची फसवणूक नेते की सरकार करते? कार्यकर्त्यांची भावना

sakal_logo
By
सलाउद्दीन चाेपदार

म्हसवड (जि. सातारा) : राज्यातील लोकसंख्येत दोन क्रमांकाचा समाज म्हणून धनगर समाजाकडे पाहिले जाते. परंतु, समाजाचे नेते विखुरलेले आहेत. समाजाच्या जिव्हाळ्याच्या आरक्षणप्रश्नी हे नेते एकत्र यायला तयार नसल्यामुळे या नेत्यांना प्रश्न सोडवायचा आहे की चिघळत ठेवायचा आहे, असा प्रश्‍न समाजाला पडला आहे. समाजाची फसवणूक नेमके करतेय कोण? सरकार की समाजाचे नेते, असा सवाल धनगर समाजातील अशोक माने, डॉ. संदीप घुगरे यांनी दिलेल्या प्रसिध्दिपत्रकात केला आहे. 

(कै.) बी. के. कोकरे यांच्यापासून आतापर्यंत आरक्षणासाठी खूप आंदोलने झाली. परंतु, नेते काही या प्रश्नावर एकत्र येत नाहीत. आजच्या घडीला समाजाचे मंत्री, माजी मंत्री, आमदार, माजी आमदार व विविध राजकीय पक्षांचे काही नेतेही आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले गेलेले आहे. समाजाच्या जीवन-मरणाचा प्रश्न असतानाही सतत राजकारण केले जात आहे. भीक दिल्यासारखा सत्तेचा तुकडा राजकीय पक्ष देतात. अनेक नेते काही या प्रश्नावर एकत्र येत नाहीत. आजच्या घडीला आण्णासाहेब डांगे, गणपतराव देशमुख, विकास महात्मे, अनिल गोटे, प्रकाश शेंडगे, राम शिंदे, दत्ता भरणे, गोपीचंद पडळकर, रामहरी रूपनवर, रामराव वडकुते, महादेव जानकर, हरिदास बधे, विश्वासराव देवकाते, सुरेश कांबळे, रमेश शेंडगे, आण्णाराव पाटील, आनंदराव पाटील, शिवाजीराव दळणर, शशिकांत तरंगे, राम गावडे, बाळासाहेब गावडे आणि इतर युवा नेते आहेत.

माजी मंत्री राम शिंदेंनी उदयनराजेंना गाठलेच! 

या सर्वांनी आपला अहंभाव बाजूला ठेऊन या प्रश्नावर एकत्र यावे, ही समस्त महाराष्ट्रातील धनगर समाजाची मागणी आहे. परंतु, या नेत्याचा अहंभाव आडवा येतो आहे. तसेच यांचे राजकीय पक्षाचे बोलवते धनीही आडवे आहेत. आता समाजाने हे नेते जोपर्यंत एकत्र येत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यामागे ऊभे राहाणे बंद करावे आणि आरक्षणासाठी समाजाने स्वतंत्र लढा उभा करण्याचा प्रयत्न करावा, असेही प्रसिध्दिपत्रकात नमूद केले असून, संदीप काळे (मुंबई), विष्णू गोरे (लातूर), प्रकाश खाडे (अहमदनगर), गणेश कोकरे (पुणे), आबा बंडगर (पुणे), बाबासाहेब माने (सातारा), संतोष वाघमोडे (सांगली), रोहित पांढरे (पुणे), जगदीश वीर (पैठण), प्रकाश देवकाते (बारामती) आदींनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

Edited By : Siddharth Latkar