esakal | सावधान! तुमची देखील अशी हाेऊ शकते फसगत; आगाशिवनगरमधून 67 हजार लुटले
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान! तुमची देखील अशी हाेऊ शकते फसगत; आगाशिवनगरमधून 67 हजार लुटले

त्यानंतर 15 मिनिटात तुमचे कार्ड बंद होईल, असे जाधव यांना सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात दुपारी साडेतीनच्या सुमारास जाधव यांच्या बॅंकेच्या खात्यावरून 67 हजार 419 रुपयांची रक्कम वर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

सावधान! तुमची देखील अशी हाेऊ शकते फसगत; आगाशिवनगरमधून 67 हजार लुटले

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : क्रेडिट कार्ड बंद आहे, असे विचारत ते सुरू करण्याच्या बहाण्याने आगाशिवनगर येथील एका नागरिकाची 60 हजारांची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. त्यांना क्रेडिट कार्डचे सगळे डिटेल्स विचारण्यात आले. त्याची माहिती देताच अवघ्या तासाभरात त्यांच्या खात्यातून अन्य खात्यात ती रक्कम वर्ग झाल्याचा मेसेज आला. त्यावरून त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. वसंत गणपती जाधव (आगाशिवनगर) असे संबंधिताचे नाव आहे.
 
पोलिसांनी सांगितले, की वसंत जाधव यांचे ऍक्‍सिस बॅंकेचे क्रेडिट कार्ड दोन महिन्यांपूर्वी त्यांना कुरिअरने मिळाले. ते कार्ड दोन महिने वापरायचे नाही, असे जाधव यांना कंपनीने सांगितले होते. त्यांना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर कॉल आला. त्यावेळी कॉल आलेल्या महिलेने क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे का, असे विचारले. त्यावेळी पुन्हा फोन करा, असे सांगितले. पुन्हा जाधव यांना रविवारी दुपारी कॉल आला. त्यावेळी ते आटके येथे होते. त्यावेळी जाधव यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डचा नंबर, जन्मतारीख अशी माहिती सांगितली.

आमदारांच्या एका हाकेत उद्योगपतीने दिली लाखांची रेमडिसिव्हर इंजेक्‍शन्स  

त्यानंतर 15 मिनिटात तुमचे कार्ड बंद होईल, असे जाधव यांना सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात दुपारी साडेतीनच्या सुमारास जाधव यांच्या बॅंकेच्या खात्यावरून 67 हजार 419 रुपयांची रक्कम वर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. मोबाईलवर त्यांच्या मेसेज आल्यानंतर ती गोष्ट लक्षात आली. त्यावेळी जाधव यांना ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

कोरोनातही या तालुक्यात रंगलाय तीनपानी जुगार, पोलिस येता सगळेच झाले गार!

मनालीच्या ऑनलाइन इको-फ्रेंडली बाप्पाच्या कार्यशाळेस राज्यातून प्रतिसाद; 700 जणांनी बनवल्या मूर्ती

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top