राष्ट्रवादी, शिवसेना, रासपनंतर पंचायत समितीवर भाजपचा झेंडा

Aparna Bhosale
Aparna Bhosaleesakal
Summary

या निवडीमुळे राष्ट्रवादी, शिवसेना, रासपनंतर भाजपला सभापतिपदाची संधी मिळाली आहे.

दहिवडी (सातारा) : माण पंचायत समितीच्या (Maan Panchayat committee) सभापतिपदी अपर्णा भोसले (Aparna Bhosale) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षीय मतभेद बाजूला ठेवत पुन्हा एकदा पंचायत समितीच्या सर्व सदस्यांची एकजूट पाहण्यास मिळाली. सभापतिपदाच्या रिक्त जागेसाठी काल पीठासीन अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली.

आजसुद्धा विविध पक्षांचे नेतृत्व करणाऱ्या नितीन राजगे, तानाजी कट्टे, तानाजी काटकर, रमेश पाटोळे, लतिका वीरकर, अपर्णा भोसले, रंजना जगदाळे, चंद्राबाई आटपाडकर या आठ सदस्यांनी एकजूट कायम ठेवली. विजयकुमार मगर व कविता जगदाळे या दोघांनी भूमिका तटस्थ ठेवली. त्यामुळे विहित कालावधीत बिदाल गणातून निवडून आलेल्या अपर्णा सोमनाथ भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. कालावधी संपल्यानंतर अपर्णा भोसले यांची सभापतिपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

Aparna Bhosale
उदयनराजेंचा निर्णय शिवेंद्रसिंहराजेंच्या हातात

अपर्णा भोसले या आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) समर्थक असल्यामुळे त्या काँग्रेसकडून निवडून आल्या असल्या तरी पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या निवडीमुळे राष्ट्रवादी, शिवसेना, रासपनंतर भाजपला सभापतिपदाची संधी मिळाली आहे. सभापतिपदी निवड झाल्याबद्दल अपर्णा भोसले यांचे खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, बाजार समिती सभापती विलासराव देशमुख, अतुल जाधव आदींनी अभिनंदन केले. निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला.

Aparna Bhosale
'कांटे की टक्कर'! निवडणुकीत दोन्ही राजे एकमेकांविरुध्द भिडणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com