Jayakumar Gore : माणमध्ये उरमोडीचे आवर्तन सुरू: ग्रामविकासमंत्री गोरे यांच्या सूचना; तारळी योजनेचेही पाणी सोडण्यात येणार

उरमोडी योजनेचे आवर्तन १३ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आले आहे. पिंगळी भरण कालव्यातून ता. १३ ते १९ फेब्रुवारीपर्यंत किरकसाल, वाघमोडेवाडी तलाव, गोंदवले बुद्रुक, पिंगळी खुर्द, गोंदवले खुर्द जानाई तलाव येथे पाणी सोडण्यात येणार आहे.
jaykumar gore
jaykumar goresakal
Updated on

बिजवडी : माण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई ध्यानात घेता उरमोडी योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. महिनाभर उरमोडीचे आवर्तन सुरू राहणार असून, त्यानंतर तारळी योजनेचेही पाणी सोडण्यात येणार आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी लघुपाटबंधारे आणि उरमोडी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com