बिजवडी : माण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई ध्यानात घेता उरमोडी योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. महिनाभर उरमोडीचे आवर्तन सुरू राहणार असून, त्यानंतर तारळी योजनेचेही पाणी सोडण्यात येणार आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी लघुपाटबंधारे आणि उरमोडी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.