साताऱ्यात लशीअभावी लसीकरण मोहीम ठप्प; जिल्ह्यात महिनाभरापासून तुटवडा

Vaccination
Vaccinationesakal

सातारा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात लस उपलब्ध झाली नसल्याने बहुतांश आरोग्य केंद्रावरील (Health Center) लसीकरण मोहीम (Vaccination Campaign) ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक केंद्रांबाहेर लसीकरण बंदचे फलक लागल्याचे दिसून आले. आज लस येणार नसल्याने उद्या (मंगळवार) लसीकरण मोहीम बंद राहणार आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात सतत लशीचा अल्प प्रमाणात साठा उपलब्ध होत असल्याने मोहिमेची गती मंदावत असल्याचे दिसून येत आहे. (Vaccination Campaign Closed In Satara District On Tuesday Satara Marathi News)

Summary

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात लस उपलब्ध झाली नसल्याने बहुतांश आरोग्य केंद्रावरील लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरातही कोरोनाच्या रुग्णांची (Corona Patient) संख्या झपाट्याने वाढत असताना लसीकरण मोहीमही गतीने सुरू होती. मात्र, जिल्ह्यात दिवसेंदिवस लशीचा साठा अत्यल्प प्रमाणात येत असल्याने लसीकरण मोहिमेला खीळ बसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी कोव्हिशिल्ड (Covishield Vaccine) तीन हजार 900, तर कोव्हॅक्‍सिन (Covaxin Vaccine) चार हजार 640 लशीचे डोस उपलब्ध झाले होते. मात्र, लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड बघता बहुतांश केंद्रावरील लस एकच दिवसात संपली.

Vaccination
कोरोनायोद्‌ध्यांना सलाम! पाचवडेश्वरात 41 गावांतील 232 बाधितांवर अंत्यसंस्कार

दरम्यान, सुरुवातीला लसीकरण सत्रांची संख्या मोठ्या संख्येने होती. मात्र, गेल्या महिनाभरापासून लशीचा तुटवडा जाणवत असल्याने जिल्ह्यात सुमारे 90 लसीकरण सत्रे ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी आठ हजार 540 लशीचा साठा उपलब्ध झाला होता. दरम्यान, जिल्ह्याला जास्तीतजास्त लशीचा साठा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Vaccination Campaign Closed In Satara District On Tuesday Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com