शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना हवीय कऱ्हाड- वडोली बस

जयंत पाटील
Thursday, 14 January 2021

त्यामुळे रस्त्यावरील रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्याचा विचार करून वाढलेल्या अतिक्रमणांवर पालिकेने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहा महिन्यांपासून बंद असलेली एसटी पुन्हा सुरू करण्याची मागणी वडोली निळेश्वर येथील ग्रामस्थ करत आहेत. कऱ्हाड ते वडोली निळेश्वर गावाचे अंतर आठ किलोमीटर असून, मार्च महिन्यांपासून एसटी बंद आहे.

त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना त्याचा त्रास सोसावा लागत आहे. येथे दिवसांत आठ ते दहा फेऱ्या सुरू होत्या. त्याचा कऱ्हाड, विद्यानगर, कोपर्डे हवेली, उत्तर पार्ले, वडोली निळेश्वर आदी ठिकाणच्या लोकांना फायदा होत होता. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना प्रवाशांची अडचणी निर्माण झाली आहे.

महाबळेश्वर तालुक्‍यात निवडणुकांचा डंका; स्थानिक गटा-तटातच रंगतदार लढती

दरम्यान बस स्थानक ते विजय दिवस चौक परिसरातील रस्त्याकडेला चायनीज, वडापाव, तसेच फळविक्रेते व साहित्य विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी विद्यार्थी व प्रवाशांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. कऱ्हाड पालिकेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरील रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्याचा विचार करून वाढलेल्या अतिक्रमणांवर पालिकेने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

ग्रामपंचयातीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अभिनेत्री आल्याने ग्रामस्थांच्या भुवया उंचावल्या गेल्या
 
Edited By : Siddharth Latkar

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vadoli Nileshwar Villagers Demands Bus From Karad Satara Marathi News