
तांबवे : वसंतगडाला दोन दिवसांपासून वणवा लावला जात आहे. त्यामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती जळत आहे. मात्र, ती वाचवण्यासाठी टीम वसंतगडचे मावळे आणि स्टुडंटस पॉवर सांगलीच्या तरुणांनी जिवाची पर्वा न करता जखमी होऊनही वणवा विझविण्यात यश मिळवले. त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.