
राजाळे : फलटण तालुक्यातील विडणी येथील डॉ. प्रदीप जाधव यांच्या उसाच्या शेतामध्ये एका महिलेचा निर्घृण खून झाल्याची घटना १७ जानेवारीला उघडकीस आली होती. यामध्ये महिलेच्या शरीराचे अवयव विविध आढळले होते, तसेच घटनास्थळी हळदी- कुंकू, गुलाल, बाहुली, दहिभात, लिंबू, चाकू, केस असे साहित्य आढळून आले होते. यावरून हा खून अघोरी प्रकारच्या अंधश्रद्धेतून केला असल्याचे दिसून येते.