वडगावच्या युवकाचे अनोखे दातृत्व; प्राथमिक आरोग्य केंद्रास औषधांची मदत

वडगावच्या युवकाचे अनोखे दातृत्व; प्राथमिक आरोग्य केंद्रास औषधांची मदत
Updated on

पुसेसावळी (जि. सातारा) : जयराम स्वामी वडगाव (ता. खटाव) येथील स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकास पवार यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला 50 हजार रुपये किमतीची औषधे देऊन अनोखे दातृत्व दाखवले आहे. त्यांनी गाव व परिसरातील कोरोना रुग्णांना उपचारार्थ रुग्णालयात नेण्यासाठी मोफत वाहनसेवाही सुरू केली आहे. 

वडगावचे पोलिस पाटील किशोर नागमल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही औषधे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्त करण्यात आली. या वेळी आरोग्य विभागाचे धनंजय जवंजाळ, गणेश जाधव, औंध पोलिस ठाण्याचे प्रशांत पाटील, "स्वराज्य'चे प्रा. नितीन भोसले, संभाजी घार्गे, जालिंदर उबाळे, चैतन्य शिंदे, महेश घार्गे, अमोल बरकडे उपस्थित होते. त्याचबरोबर कोरोना महामारी काळात गावामध्ये ग्रामस्थांना सेवा-सुविधा देणारे गावातील डॉक्‍टर, पोलिस, होमगार्ड, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकारांना प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनायोद्धा म्हणून सन्मानपत्र देण्यात आले. विकास पवार यांनी याआधी गावातील प्राथमिक शाळेस 40 हजार रुपये किमतीचे संगणक, त्याचबरोबर जयराम स्वामी मठ परिसरात 50 हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे देऊ केले आहेत. 

रुग्णांसाठी मोफत वाहनसेवा 
सध्या वडगाव आणि परिसरात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने रात्री-अपरात्री एखाद्यास उपचारासाठी दवाखान्यात न्यायचे असल्यास चारचाकी वाहन मिळत नाही. अशावेळी संबंधित रुग्ण व कुटुंबातील व्यक्ती घाबरतात, ही बाब श्री. पवार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी अशा रुग्णांसाठी मोफत वाहन देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी श्री. पवार यांच्याकडे संपर्क साधावा, असे पोलिस पाटील नागमल यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com