.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
तारळे: तारळी धरण प्रकल्पांतर्गत निवडे, सावरघर, कुशी व भांबे ही गावे बाधित होऊन या गावांचे अन्यत्र पुनर्वसन झाले. त्या गावांच्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या इतर वाड्यांची ससेहोलपट आजही सुरूच आहे. ग्रामपंचायत नसल्याने डोंगरमाथ्यावरील डफळवाडी, केंजळवाडी, भोकरवाडी, बागलेवाडी, जळकेवाडी, जिमनवाडी व बामणेवाडी आदी गावांना अनेक मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. अनेक हक्क हिरवले गेले आहेत. त्याविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा न करता जलसमाधी घेण्याचा प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.