नंदुरबारचे विनय गौडा साताऱ्याचे नवे सीईओ

उमेश बांबरे
Thursday, 24 September 2020

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. पण, साताऱ्यात संसर्ग जास्त वाढलेला आहे. या पार्श्‍वभूमीर आम्ही सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपायांवर भर देणार असून जिल्हा कोरोनामुक्त करण्याला आमचे प्रथम प्राधान्य राहणार असल्याचे गौडा यांनी सांगितले.

सातारा : ऐन कोरोना संसर्गाच्या काळात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. आज (ता. २४) अचानक झालेल्या या फेरबदलामध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची साताऱ्यात नियुक्ती करण्यात आली आहे. ते उद्या (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, संजय भागवत यांना कोणतीही नियुक्ती दिलेली नाही. 

विनय गौडा हे 2015 च्या आयएएसच्या बॅचचे अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेची सुरवात नाशिक येथून परिविक्षाधीन अधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांची नंदुरबारला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तेथे तीन वर्षे काम केल्यानंतर त्यांची नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली. आतापर्यंत ते तेथेच कार्यरत होते. नंदुरबार जिल्हा आदिवासी भागात असल्याने तेथे काम करताना अनेक आव्हाने त्यांना पार पाडावी लागली होती. नंदुरबार जिल्ह्यात त्यांनी घरकुल योजना प्रभावीपणे राबविली. घरकुल योजनेत त्यांनी राज्यात चांगले काम केले होते, तसेच आदिवासी पाड्यांवर कुपोषण मुक्तीला प्राधान्य दिले होते. तेथील मुलांसाठी मॉडेल शंभर अंगणवाडी आणि दोनशे मॉडेल शाळा उभारल्या होत्या. 

बोगस पदभरती प्रकरणात चौकशी समिती; तत्कालीन अधिकाऱ्यांकडे चौकशीचा तगादा

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. पण, साताऱ्यात संसर्ग जास्त वाढलेला आहे. या पार्श्‍वभूमीर आम्ही सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपायांवर भर देणार असून जिल्हा कोरोनामुक्त करण्याला आमचे प्रथम प्राधान्य राहणार असल्याचे गौडा यांनी सांगितले. श्री. गौडा हे उद्या (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता सातारा जिल्हा परिषदेचा कार्यभार स्वीकारणार आहेत. ऐन कोरोना संसर्गाच्या काळात सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांची अचानक बदली झाली आहे. यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच श्री. भागवत यांना दुसरी कोणतीही नियुक्ती दिलेली नाही. आजपर्यंत सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नतीवर बदली झाल्याचा इतिहास आहे. पण, श्री. भागवत यांच्याबाबत मात्र, नेमके उलटे घडले आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. पण, साताऱ्यात संसर्ग जास्तच वाढलेला आहे. या पार्श्‍वभूमीर आम्ही सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपायांवर भर देणार असून जिल्हा कोरोनामुक्त करण्याला आमचे प्रथम प्राधान्य राहणार आहे. 
-विनय गौडा, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinay Gowda Is The New CEO Of Satara Zilha Parishad Satara News