
आसू/जाधववाडी : ‘‘मी पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेल्यानंतर माझ्या मतदारसंघातील धरणाचा प्रश्न मार्गी लावत असताना रामराजे यांनी मला मोलाची साथ दिली. रामराजेंनी पाण्यासाठी संघर्ष केल्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी फलटण येथे कृष्णा खोरे महामंडळाची घोषणा केली. महाराष्ट्राच्या प्रगतीची सुरुवात झाली,’’ असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार विनय कोरे यांनी केले.