Video : मित्रांनो! काळजी करु नका, मी जिवंत आहे

काळजात धडकी भरवणाऱ्या वायरमनच्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
Mahavitran
Mahavitran Mahavitran
Updated on: 

सातारा : सध्या साेशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल हाेत आहे. हा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या छातीत धस्स हाेत आहे. व्हिडिओमधील व्यक्ती विद्युत यंत्रणेच्या डीपीवर चढते. तारांना चिकटून राहते आणि अवघ्या काही क्षणांत खाली तेथेच निपचीत पडते. हा व्हिडिओ महादेव वाघ (रा. मोळ ता. खटाव) पुसेगाव महावितरण कार्यालयात वायरमन म्हणून काम पाहणा-या कर्मचा-याचा आहे. या अपघातात ते जखमी झाले असून उपाचारानंतर पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.

व्हायरल होणारा व्हिडिओ हा मोळ (ता. खटाव) येथील महादेव वाघ यांचा आहे. श्री. वाघ हे पुसेगाव येथील महावितरण कार्यालयात वायरमन म्हणून कार्यरत आहेत. सुमारे एक महिन्यांपुर्वी पुसेगाव हद्दीतील पुसेगाव-वडूज रस्त्यावर येथील शंकर पार्वती सर्व्हिसिंग सेंटर येथील सिंगल फेज डीपी वरील दुरुस्ती करताना त्यांचा अपघात झाला. त्यामध्ये ते जखमी झाले. सध्या त्यांची तब्येत ठणठणीत असून ते कामावर रुजू झाले आहेत.

महादेव वाघ यांचा डीपीवर काम करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या काळजात धस्स होत आहे. अर्थाच व्हिडिओमधील घटना देखील तशीच आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना महावितरणच्या कर्मचा-यांवर असलेली जोखीम समजते. हा अपघात अचानक सुरु झालेल्या विद्युत पूरवठ्यामुळे घडला असेल असे तज्ञांनी ई-सकाळशी बोलताना नमूद केले. दरम्यान वाघ यांनी मी ठणठणीत असून पुन्हा कामावर हजर झालो आहे असे सांगतानाच व्हायरल होणा-या व्हिडिओमुळे लोकांमध्ये आजही भावना जागृत असल्याचे जाणवते असे नमूद केले. परंतु संभ्रम निर्माण करणा-या व्हिडिओची सत्यता देखील लोकांनी तपासली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Raju Shetti warning to sugar factories
Krishna Sugar Factory Karad
High Court Decision on Anil Desai and Rajendra Rajpure Election Eligibility Creates Legal Uncertainty for Seven Other Directors
Sonal Sonawane Success Story From Losing Her Husband to Building a Future for Two Children Through Courage and Determination
Marathi News Esakal
www.esakal.com