esakal | वाघावळेच्या 'मल्लिकार्जुन'वर तीर्थक्षेत्राची माेहाेर

बोलून बातमी शोधा

वाघावळेच्या 'मल्लिकार्जुन'वर तीर्थक्षेत्राची माेहाेर}

न्यासाचे सचिव महादेव गुरुजी यांच्या परिश्रमाला यश आले असून, या सर्वांचे ग्रामस्थ तसेच श्री मल्लिकार्जुन देवालय ट्रस्टचे अध्यक्ष एच. बी. जंगम यांनी आभार व्यक्त केले आहेत.

satara
वाघावळेच्या 'मल्लिकार्जुन'वर तीर्थक्षेत्राची माेहाेर
sakal_logo
By
रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर तालुक्‍यातील श्री क्षेत्र पर्वत तर्फ वाघावळे येथील जोम मल्लिकार्जुन देवालयाला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचे मान्य केल्याने वाघावळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आमदार मकरंद पाटील यांनी श्री क्षेत्र पर्वत तर्फ वाघावळे या शिवमंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी व निधी मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.जिल्हा वार्षिक योजनेची सन 2021-22 च्या प्रारुप आराखडा मंजुरीची बैठक पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी श्री जोम मल्लिकार्जुन देवालय वाघावळे (ता. महाबळेश्वर) या स्थळाला "क' वर्ग यात्रास्थळाचा दर्जा देण्याबरोबर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण कामाबाबत तसेच 2019-20 च्या मंजूर आराखड्यातील तांत्रिक मान्यता प्राप्त असलेली प्रास्तावित कामे व सन 2020-21 च्या आराखड्याबाहेरील कामे आराखड्यात समाविष्ट करण्याबाबत सभागृहात सदस्यांसोबत चर्चा होऊन मान्यता दिली. 

वैभवशाली इतिहासाची साक्ष असणाऱ्या मालुसरेंच्या जन्मभूमीचा कायापालट करणार

याकामी आमदार मकरंद पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांचे विशेष प्रयत्नातून हा दर्जा प्राप्त झाला असून, यामुळे ग्रामस्थांना आता भाविकांना चांगल्या सुविधा देता येणार आहेत. याबरोबरच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडतरे, व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक सावंत आदींचे सहकार्य लाभले. न्यासाचे सचिव महादेव गुरुजी यांच्या परिश्रमाला यश आले असून, या सर्वांचे ग्रामस्थ तसेच श्री मल्लिकार्जुन देवालय ट्रस्टचे अध्यक्ष एच. बी. जंगम यांनी आभार व्यक्त केले आहेत.

चुलीवरचे जेवण! सह्याद्रीत आंदाेलनाचा इशारा

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाचा अजब कारभार; महिलांसह विद्यार्थी त्रस्त

ही दाेस्ती तुटायची नाय! आम्ही एकत्र येऊ नये का? शशिकांत शिदें

Edited By : Siddharth Latkar