Wai APMC Result : वाई बाजार समितीवर राष्ट्रवादीची सत्ता; आमदार मकरंद पाटील यांचे पॅनल सर्व ११ जागांवर विजयी

वाई येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सत्तारूढ सहकार प्रगती पॅनलने सर्व ११ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
Wai APMC Election Result
Wai APMC Election Resultsakal
Summary

वाई येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सत्तारूढ सहकार प्रगती पॅनलने सर्व ११ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

वाई - येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सत्तारूढ सहकार प्रगती पॅनलने सर्व ११ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. व सत्ता कायम राखली. सर्व उमेदवार ५०० ते ६०० मतांच्या मताधिक्याने विजयी झाले. विरोधी शेतकरी परिवर्तन पॅनलला एकही जागा मिळाली नाही. विरोधकांना जनाधार नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. यापूर्वी सात सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये सत्तारूढ गटाचे सहा व विरोधी एक सदस्याचा समावेश आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता.३०) ९०.५७ टक्के मतदान झाले होते. आज सकाळी दहा वाजता बाजार समितीच्या शेतकरी सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सहायक निबंधक श्री.जी. टी. खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरू झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक तथा प्रभारी तहसीलदार सौ.वैशाली जायगुडे - घोरपडे,सहायक निवडणूक अधिकारी चंद्रशेखर भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती.पाच टेबलवर एक पर्यवेक्षक, एक रो ऑफिसर व तीन सहाय्यक यांनी मताची मोजणी केली. सुरवातीला संस्था, ग्रामपंचायत त्यानंतर व्यापारी मतदार संघाची मतमोजणी झाली. निकाल जाहीर होताच बाजार समितीच्या प्रवेश द्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. तालुका अध्यक्ष प्रमोद शिंदे, प्रदेश सरचिटणीस प्रताप पवार यांनी सर्व विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले. यावेळी पोलीस चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार प्रगती पॅनेलचे विजयी उमेदवार या प्रमाणे (कंसात मते) :- सहकारी संस्था (सोसायटी) सर्वसाधारण मतदार संघ:-(सात जागा)- केशव शंकर गाढवे (६२४). रमेश व्यंकटेश गायकवाड (६१९). पोपट गणपत जगताप (६२१). मोहन सर्जेराव जाधव ( ६१४). राहुल मधुकर डेरे (६२३). रवींद्र संपत मांढरे (६१३). विनायक प्रभाकर येवले (६१५)

ग्रामपंचायत (सर्वसाधारण) मतदार संघ:- (दोन जागा) - तानाजी बरमाराम कचरे (६४९) व दत्तात्रय शिवाजीराव बांदल (६२४).

व्यापारी मतदारसंघ (दोन जागा) - तुकाराम रघुनाथ जेधे (४७३) व नानासाो गणपतराव शिंदे (४६६).

दरम्यान बाजार समितीत महिला राखीव मधून श्रीमती शशिकला चंद्रकांत सावंत, सौ. संगीता शंकर भणगे, भटक्या जाती जमाती मधून राहुल साळू वळकुंडे, नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग मधून संजय बंडू मोहोळकर, हमाल - मापाडी मधून सचिन भानुदास फरांदे, अनुसूचित जाती जमाती राखीव मधून अशोक सावळाराम सोनवणे, तर आर्थिक दुर्बल घटक गटातून विवेक भोसले हे सात सदस्य यापूर्वी बिनविरोध निवडून आले आहेत.

विरोधी शेतकरी परिवर्तन पॅनलचे पराभूत उमेदवार - संस्था मतदार संघ - मेघराज शिंदे (६४), रमेश वाडकर (६४). ग्रामपंचायत मतदार संघ -संतोष विलास शिंदे (१०९ अपक्ष).

व्यापारी मतदार संघ - नितीन तरटे. (१६४), रवींद्र भिलारे (११९).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com