पुढच्या रविवारपर्यंत सहकार्य करा, आम्हांला लाेकं महत्वाची पैसे नाही : व्यापारी महासंघ

पुढच्या रविवारपर्यंत सहकार्य करा, आम्हांला लाेकं महत्वाची पैसे नाही : व्यापारी महासंघ
Updated on

वाई (जि. सातारा) : वाई तालुक्‍यात कोरोनाचा उद्रेक वाढतच आहे. तालुक्‍यासह शहरात 43 आणि ग्रामीण भागात 25 असे नव्याने एकूण 69 बाधित नुकतेच सापडले. तालुक्‍यातील एकूण बाधितांची संख्या 1605 पार झाली आहे. दरम्यान, वाढता संसर्ग रोखण्यासाठी वाई व्यापारी महासंघाने येत्या मंगळवारपासून रविवारपर्यंत (ता. 13) असा एक आठवडा शहरात जनता कर्फ्यू पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.
सातारकरांनो, मला माफ करा.. मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवलीय
 
गेल्या 48 तासांत वाईत 4, शहरात फुलेनगर, सिद्धनाथवाडी, रामडोह आळी, ब्राह्मणशाही येथे प्रत्येकी 1, गणपती आळीत 3, सोनगीरवाडीत 8, गंगापुरीत 2, भगवाकट्टा मधली आळीत 9, ग्रामीण भागात सह्याद्रीनगरमध्ये 2, यशवंतनगरमध्ये 7, बोपेगावमध्ये 7, कवठे येथे 4, पसरणी, जांब, अमृतवाडी, व्याजवाडी येथे प्रत्येकी 3, वेरुळी, उडतारे, देगाव, सुरूर, पाचपुतेवाडी, बोपर्डी, कुसगाव, भुईंज या गावांत प्रत्येकी एक असे एकूण 69 बाधित सापडले आहेत.

पाऊस, किडीमुळे राजमा धोक्‍यात; काढणी सुरू असताना पावसाची हजेरी

तालुक्‍यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन आज वाई शहर व्यापारी महासंघाची बैठक झाली. या वेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एक आठवडा जनता कर्फ्यू घोषित करून सर्व दुकाने उत्स्फूर्तपणे 100 बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्याबाबतचे निवेदन तहसीलदार रणजित भोसले यांना देण्यात आले. कोरोना महामारीला सामोरे जाताना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व बाधितांना दिलासा देण्यासाठी सर्व स्तरावर प्रशासन जबाबदारी घेत आहे. मात्र, आज तालुक्‍यात कम्युनिटी स्प्रेड सुरू झाल्याने प्रत्येक गावात व घराघरांत कोरोना विषाणू पोचत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अनेकांना जीव गमवावा लागत आहे. यामध्ये व्यापाऱ्यांचाही समावेश आहे. बंदमुळे व्यापारी वर्गाचे नुकसान होत असले, तरी नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे.

वाईतील खवले मांजर तस्करीप्रकरणात रक्षकच बनला भक्षक! 

त्यामुळे वाढता संसर्ग रोखण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी म्हणून तालुक्‍यातील सर्व व्यापारी, डिमार्ट संस्था व नागरिकांनी या जनता कर्फ्यूमध्ये सहकार्य करावे आणि कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन वाई व्यापारी महासंघातर्फे करण्यात आले आहे. तहसीलदारांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. 

वाई परिसरात मारामारी करणाऱ्या टोळीतील तिघांवर कारवाई

Edited By : Siddharth Latkar

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com