आनेवाडी टोलनाका प्रकरणात शिवेंद्रसिंहराजेंसह 17 समर्थकांना जामीन

भद्रेश भाटे
Saturday, 28 November 2020

शिवेंद्रसिंहराजे व इतरांच्या वतीने शिवराज धनवडे, आर. डी. साळुंखे, संग्राम मुंढेकर, प्रसाद जोशी यांनी, तर सरकार पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले. पुढील सुनावणी नऊ डिसेंबर रोजी होणार आहे.

वाई (जि.सातारा) : आनेवाडी टोलनाक्‍यावरील टोलबंद आंदोलन प्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या 17 समर्थकांना शुक्रवारी वाई न्यायालयाने जामीन मंजूर केला.पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था झालेली असताना, तसेच आवश्‍यक सेवासुविधा मिळत नसतानाही आनेवाडी टोलनाक्‍यावर टोल वसुली होत असल्याने महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्या विरोधात शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या समर्थकांनी ता. 18 डिसेंबर 2019 रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत आनेवाडी टोलनाक्‍यावर आंदोलन केले होते.

या वेळी साताऱ्याकडून विरमाडे (ता. वाई) गावाकडे टोलनाक्‍याचे लेन क्रमांक एकच्या बाजूस कठड्यावर शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांचे समर्थक फिरोज पठाण, जितेंद्र सावंत, मिलिंद कदम, सर्जेराव सावंत, जयश्री गिरी, सरिता इंदलकर, विद्या देवरे, कांचन साळुंखे, जितेंद्र कदम, सुहास गिरी, धनंजय जांभळे, नासीर शेख, अशोक मोने, अमोल कदम, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, अमोल मोहिते आणि 80 लोकांनी नाक्‍यावरील टोल वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न केला. टोल नाक्‍यावर बसून विरोधी घोषणा देत निदर्शने केली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केला म्हणून पोलिस कर्मचारी धनाजी तानाजी कदम यांनी सर्व आंदोलकांच्या विरोधात भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
पदाची झूल बाजूला सारून एकनाथ शिंदेंनी रुजवली मायभूमीत स्ट्रॉबेरी

या खटल्याच्या सुनावणीसाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले व इतरांवर वेळोवेळी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, ते न्यायालयात उपस्थित राहात नव्हते. शुक्रवारी (ता.27)
शिवेंद्रसिंहराजे व सर्व संशयित 17 जण न्यायालयात उपस्थित राहिले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. पाच हजारांच्या जातमुचलाक्‍यावर शिवेंद्रसिंहराजेंना न्यायालयाने जमीन मंजूर केला.
सावधान! साता-यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने गंडा घालणारी टोळी सक्रिय

शिवेंद्रसिंहराजे व इतरांच्या वतीने शिवराज धनवडे, आर. डी. साळुंखे, संग्राम मुंढेकर, प्रसाद जोशी यांनी, तर सरकार पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले. पुढील सुनावणी नऊ डिसेंबर रोजी होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wai Court Order Bail To BJP Leader Shivendrasinghraje Bhosale Satara News