
वाई : शहर व परिसरातून चोरीस गेलेले सुमारे १२ लाख रुपये किमतीचे एकूण ६० मोबाईल शोधण्यात वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाला यश आले. त्यांनी ते मोबाईल मूळ मालकांना परत केले. या वर्षभरात एकूण १९४ विविध कंपन्यांचे नामांकित मोबाईल वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने तक्रारदार यांना परत केले आहेत.