Satara Politics
Satara Politicsesakal

साताऱ्यात भाजपला बसणार मोठा धक्का! 'हा' माजी आमदार हाती घेणार तुतारी? जयंत पाटलांसोबत गुफ्तगू

MLA Jayant Patil : गेल्‍या काही दिवसांपासून वाई-खंडाळा-महाबळेश्‍‍वर मतदारसंघात वेगवान राजकीय घडामोडी होत आहेत.
Published on
Summary

भाजपमध्ये डावलण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांनी मदन भोसलेंवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.

सातारा/ भुईंज : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, रविवारी सकाळी राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी माजी आमदार मदन भोसले (Madan Bhosale) यांची सदरबझार येथील निवासस्‍थानी भेट घेतली. यावेळी मदन भोसले यांच्या कन्‍या सुरभी भोसले-चव्‍हाण या देखील उपस्‍थित होत्‍या. भेटीअंती काय चर्चा झाली, याचा तपशील समजू शकला नसला, तरी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रसारमाध्‍यमांसमोर बोलताना सगळेच माझे मित्र आहेत, असे सूचक वक्‍तव्‍य केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com