

Panchayat Samiti members discuss drought conditions and irrigation issues in Walwa taluka
esakal
ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातील दहापेक्षा अधिक गावांत पावसाअभावी दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या भागात उपसा सिंचन बंद केल्याने हातात आलेली पिके वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे उपसा सिंचनावरील बंदी उठवून वाळवा तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ठराव करून पाठविण्यात येईल, अशी माहिती सभापती उदयसिंह पाटील यांनी पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत दिली.