कऱ्हाड, पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

सचिन शिंदे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

धरणाच्या पाण्याची आजची उंची 2109.09 आहे. तीच मागील आठवड्यात 2108.03 इतकी होती. मागील आठवड्यात धरणाचा पाणी साठा 50.91 होता तर आजचा पाणी साठा 52.22 टीएमसी आहे. 

कऱ्हाड (जि.सातारा) : काेयना धरण पाणलोट क्षेत्रात पावासाचा जोर कमी झाला आहे. धरणाच्या क्षेत्रात सिंचनासाठी कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातून आज (रविवार) सायंकाळी पाच वाजल्यापासून पाणी सोडण्यात येणार आहे. पायथा विजगृहातून एक युनिट सुरू करण्यात येणार आहे. त्यातून एक हजार 50 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात होणार आहे. सिंचन व बिगर सिंचनसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.
अकरावीचे प्रवेश ऑनलाइन 

गेल्या रविवारपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी आठवडभरात धरणात तब्बल 1.31 टिएमसी पाणी वाढले आङे. सध्या कोयनेचा पाणी साठा 52.22 टिएमसी आहे. धरणात चोवीस तासात एक हजार 986 क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. कोयनेला दोन, नवजाला केवळ एक तर महाबळेश्वरला 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांनो खिसा रिकामा झालाय, मग 'ही' आहे तुमच्यासाठी गुड न्यूज 

धरणाच्या पाण्याची आजची उंची 2109.09 आहे. तीच मागील आठवड्यात 2108.03 इतकी होती. मागील आठवड्यात धरणाचा पाणी साठा 50.91 होता तर आजचा पाणी साठा 52.22 टीएमसी आहे अशी माहिती काेयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली. आज (रविवार) साेडण्यात येणारे पाणी हे कराड व पाटण तालुक्यातील शेतीसाठी उपयाेगात येईल असे पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water From Koyna Dam will Release Today Evening Five PM