esakal | कोयनेत जोरदार पाऊस; धरणाच्या पातळीत अडीच 'TMC'ने वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Koyna Dam

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक २३ हजार ६१६ क्युसेक झाली आहे.

कोयनेत जोरदार पाऊस; धरणाच्या पातळीत अडीच 'TMC'ने वाढ

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (सातारा) : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर (Heavy Rain) पुन्हा वाढल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक २३ हजार ६१६ क्युसेक झाली आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात अडीच टीएमसीने वाढ झाली असून, धरणातील पाणीसाठा ५२.२९ टीएमसी झाला आहे. मुसळधार पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी ५,००० मिलिमीटर पाऊस पडतो. या वर्षी १०५ टक्के पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. (Water Level Of Koyna Dam Increased By 2.5 TMC bam92)

एक जूनपासून धरणात ३१ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात २२ टीएमसीने वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रात ७५ टक्के पाऊस शिल्लक असून, २५ टक्के पर्जन्यमानातच कोयना ५० टीएमसीवर भरले आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासांत झालेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सोमवारी पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायमच होती. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगरला २८, नवजात ४८, तर महाबळेश्वर येथे ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची जलपातळी २१०९.१० फूट असून, धरणात ५२.२९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

Water Level Of Koyna Dam Increased By 2.5 TMC bam92

loading image