वारणा नदीवरील पाण्याची मालकी नांदगावकरांची की शासनाची?; नागरिकांत संभ्रम

माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांनी वारणा व कृष्णा नद्यांचा पहिला नदीजोड प्रकल्प राबवला.
Warna River
Warna Riveresakal

काले (सातारा) : वाकुर्डे पाणी योजनेतील (Wakurde Water Scheme) वारणा नदीचे पाणी तातडीने दक्षिण मांड नदीला (Mand River) मिळाले. मात्र, जुजारवाडीतील बंधारा भरण्याच्या अगोदरच पाणी बंद झाले. त्यामुळे वारणा नदीवरील (Warna River) पाण्याची मालकी नांदगावकरांची की शासनाची, हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. (Water Of Warna River In Wakurde Water Scheme Got To Mand River Satara News)

माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांनी वारणा व कृष्णा नद्यांचा पहिला नदीजोड प्रकल्प राबवला. त्यामुळे दक्षिण मांड नदी परिसरातील शिवारे हिरवी झाली. मात्र, अनेक वर्षांपासून जुजारवाडी- काले येथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. याबाबत दै "सकाळ'ने आवाज उठवला होता. त्यानंतर तातडीने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक घेतली. तांत्रिक अडचणी बाजूला सारून "वारणा'चे पाणी दक्षिण मांड नदीपात्रात सोडण्यात आले. नदीचे पाणी सोडल्याचे समजताच नांदगाव येथील शेतकऱ्यांनी बंधाऱ्यावर फळ्या टाकल्या. त्यामुळे नांदगावच्या पुढील गावांना कमी प्रमाणात पाणी मिळाले.

जुजारवाडीपर्यंत ते कसेतरी पोचले. नांदगाव बंधारा पूर्ण भरला असून त्यातून पाणी पुढे येत नाही. नांदगावकरांची या पाण्यावरील दादागिरी अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे पाण्याचे मालक शासन की नांदगावकर, असा सवाल शेतकरी विचारत आहेत. आमदार चव्हाणांनी जुजारवाडी बंधारा पूर्ण भरेल तेव्हा पाणी बंद करा, असे सांगितले. मात्र, नांदगावकर यांनी पाणी का अडवले, हा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. काले व परिसरातील शेतकऱ्यांवर पाण्याबाबत अन्याय केला जात आहे. त्याकडे प्रशासन व आमदारांनी लक्ष देण्याची गरज आहे. नदीचे पात्र फक्त ओले करण्यासाठी पाणी आले होते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नांदगाव येथील शेतकऱ्यांनी बंधाऱ्यावर टाकलेल्या फळ्या काढाव्यात व पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

सातारकरांनाे! सिव्हिलला निघालात? थांबा, RT-PCR लॅब पडलीय बंद

Water Of Warna River In Wakurde Water Scheme Got To Mand River Satara News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com