Satara : कोयना धरणातून नदीपात्रात आज पाणी सोडण्यात येणार; कृष्णा कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण (पाटण) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.
water released from Koyna Dam into riverbed
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण (पाटण) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.Sakal
Updated on

कराड : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण (पाटण) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज गुरुवारी दुपारी चार वाजता धरणाचे वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उचलून सांडव्यावरून १० हजार क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपत्रात सुरू करणेत येणारआहे. धरणातील पाण्याच्या आवकेनुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल असे धरण व्यवस्थापनाने कळविले आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एकाच आठवड्यात 30 टीएमसी हून अधिक पाण्याची आवक झाली आहे. कोयना धरणात आज गुरुवारी सकाळी आठ वाजता ७५.२६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरण पायथा विद्युत गृहामधील १०५० क्युसेक्स विसर्ग दोन दिवसापूर्वी सुरू करण्यात आला आहे कोयना धरणातील पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज गुरुवारी दुपारी चार वाजता कोयना धरणाच्या वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उचलून सांडव्यावरून १० हजार क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपत्रात सुरू करणेत येणार आहे.

त्यामुळे कोयना धरणातून कोयना नदीमध्ये ११ हजार ५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Stormy Winds Turn Fatal at Koyna Reservoir; Boat Driver Loses Life in Mishap
Nearly completed cable-stayed bridge over Koyna reservoir connecting Ahir and Tapola.
Deputy CM Eknath Shinde reviewing water conservation efforts under the ‘Gal Mukt Dharan, Jal Yukt Shivar’ scheme.
Sonewadi Youth Loses Life in Mahabaleshwar Drowning Incident
Marathi News Esakal
www.esakal.com