ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर; ऐन पावसाळ्यात मायणीत पुन्हा पाणीटंचाई

Water Scarcity
Water Scarcityesakal

मायणी (सातारा) : मायणी प्रादेशिक योजनेची (Mayani Regional Scheme) पाणी उपसा करणारी मोटार पंधरवड्यातच पुन्हा नादुरुस्त झाल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मायणीकरांना पुन्हा पाणीटंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागत आहे. खासगी टॅंकरसाठी (Private Tanker) आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना ऐन पावसाळ्यात (Heavy Rain) पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. (Water Shortage Again In Mayani Area Satara Marathi News)

Summary

मायणी प्रादेशिक पाणी योजनेचा, पाणीउपसा करणारा वीजपंप वारंवार बिघडत आहे. गेल्या महिन्यांत वीजपंप बिघडल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास तब्बल २० दिवस लागले.

मायणी प्रादेशिक पाणी योजनेचा, पाणीउपसा करणारा वीजपंप वारंवार बिघडत आहे. गेल्या महिन्यांत वीजपंप (Electric Pump) बिघडल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास तब्बल २० दिवस लागले. मे महिन्याच्या अखेरीस पूर्ववत झालेला येथील नळ पाणीपुरवठा गेल्या आठवड्यापासून पुन्हा खंडित झाला आहे. योजनेचा येरळवाडी मध्यम प्रकल्पातील (Yeralwadi Medium Project) पाणी उपसा करणारा वीज पंप पुन्हा नादुरुस्त झाला आहे. बिघडलेल्या पंपांची दुरुस्ती वेळेत केली जात नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरा वीजपंप दुरुस्त करून ठेवला जात नाही. परिणामी दर पंधरवडा महिन्याला येथे पाणीटंचाईने नागरिक त्रस्त होत आहेत. येथील सुमारे २० हजारांवर लोकसंख्येला अद्याप शुद्ध पाणीपुरवठ्याची सोय ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असलेले नागरिकही संताप व्यक्त करीत आहेत.

Water Scarcity
म्हारवंडला भूस्खलनाचा धोका; 'माळीण'सारख्या दुर्घटनेची शक्यता?

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून पुन्हा येथील कचरेवाडी, इंदिरानगर, माळीनगर, चांदणी चौक, शिक्षक कॉलनी, सराटे मळा, लक्ष्मीनगर, खंडोबा माळ, नवीन गावठाण आदी भागांतील पाणीपुरवठा बंद झाला आहे. वारंवारच्या टंचाईने नागरिक हैराण झाले आहेत. पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. आधीच महागाईने घायकुतीला आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना एका टँकरसाठी सहाशे रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे त्रस्त नागरिक ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारावर तोंडसुख घेत आहेत. तातडीने पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी करीत आहेत.

Water Scarcity
साताऱ्यासह कऱ्हाडात धुवांधार; ढेबेवाडी खोऱ्यातील महिंद धरण 'ओव्हरफ्लो'

दुसऱ्या मोटारीची पर्यायी व्यवस्था असतानाही ती दुरुस्त करून ठेवली जात नाही. गाव कारभाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे लोकांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे.

-दादासाहेब कचरे (माजी उपसरपंच, मायणी)

Water Shortage Again In Mayani Area Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com