सातारा : सहा गावे, पाच वाड्यांवर पाणीटंचाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water tanker

सातारा : सहा गावे, पाच वाड्यांवर पाणीटंचाई

सातारा - जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली असून त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सध्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील सहा गावे व पाच वाड्यांवर सात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सहा हजार ९०८ लोकसंख्येला आणि एक हजार ८६९ पशुधनाला टॅंकरने पाणी पुरविले जात आहे. आगामी दोन आठवड्यात टॅंकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून सुमारे ५० गावांत पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याचे सांगितले जात असले तरी बहुतांशी विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्‍य सध्या पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढू लागल्या असून माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांसह कऱ्हाड, वाई व सातारा तालुक्यांतील दुर्गम डोंगराळ भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आगामी काळात आणखी ५० गावांत टंचाई भासण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सध्या जिल्ह्यात सहा गावे व पाच वाड्यांवर पाणीटंचाई जाणवत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सात टॅंकरव्दारे या गावे व वाड्यांना १४ खेपांव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या सात टॅंकर सुरू असून यामध्ये वाई- दोन, सातारा- दोन, कऱ्हाड- दोन, माण- एक याप्रमाणे टॅंकर सुरू आहेत. सहा गावे व पाच वाड्यांवरील सहा हजार ९०८ लोकसंख्या बाधित असून एक हजार ८६९ पशुधनाला टॅंकरने पाणी पुरविले जात आहे. टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी सहा विहिरी व पाच बोअरवेलचे अधिगृहण करण्यात आले आहे. सध्या हवेत मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली असून दिवसाचे तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. परिणामी, दुर्गम भागातील गावांत तसेच दुष्काळी तालुक्यांतील काही गावांत आगामी काळात टंचाई भासू शकते. या गावांत मागणीनुसार टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.

टंचाई भासणारी तालुकानिहाय गावे व वाड्या

वाई- मांढरदेव, गडगेवाडी, सातारा- जांभ, आवाडवाडी, निकमवाडी, कऱ्हाड- वानरवाडी, वामनवाडी, माण- पाचवड गावठाण, शिंगाडेवस्ती, गेंदवाडा, फलटण- जिंती. विहिरी व बोअरवेलचे अधिगृहण : खटाव- दोन विहिरी व तीन बोअरवेल, वाई- दोन विहिरी, सातारा- एक विहीर, कऱ्हाड- एक विहीर, फलटण- दोन बोअरवेल.

Web Title: Water Shortage On Six Village Five Vadhi Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top