पालकमंत्र्यांच्या आदेशाची 24 तासांत अंमलबजावणी; नेर तलावातून रब्बीसाठी सोडले पाणी

पालकमंत्र्यांच्या आदेशाची 24 तासांत अंमलबजावणी; नेर तलावातून रब्बीसाठी सोडले पाणी
Updated on

विसापूर (जि. सातारा) : खटाव तालुक्‍याच्या उत्तर भागातील नेर तलावाच्या उजव्या कालव्यातून सोमवारी सायंकाळी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची कृष्णा सिंचन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 24 तासांतच अंमलबजावणी केल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी नेर तलावातील पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्यात यावे, या मागणीचे निवेदन रविवारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले होते. पालकमंत्र्यांनी कृष्णा सिंचन विभागाला त्वरित पाणी सोडण्याचे आदेशही दिले होते. सोमवारीही त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या. सिंचन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्वरित हालचाली करून 24 तासांच्या आत पालकमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली. सोमवारी सायंकाळी नेर धरणाच्या उजव्या कॅनॉलमधून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले. सोडण्यात आलेले पाणी खातगुण, भांडेवाडी, खटाव, हुसेनपूर आणि सिद्धेश्वर कुरोलीपर्यंत जाणार आहे. गेल्या वर्षी कुरोलीच्या पुढील आठ किलोमीटर कॅनॉलची स्वच्छता केली असल्याने या वर्षी कुमठेपर्यंत पाणी पोचविले जाणार आहे. रब्बी हंगामासाठी वेळेत पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. 

पाणी सोडण्याची मागणी करताच पालकमंत्र्यांच्या आदेशाने रब्बी हंगामासाठी नेरचे पाणी सोडण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज आणि पाणीपट्टी भरून कृष्णा सिंचन विभागाला सहकार्य करावे. 
- प्रदीप विधाते, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mahimangad Fort on the Path to Preservation; State-Protected Status Likely Soon
Karad Airport Modernization Faces Delays; Safety and Development Issues Under Scrutiny
Political Strategy in Full Swing Ahead of Council Polls; BJP Focuses on Securing Votes
Koyna Dam Water Levels Reach Critical Stage, Irrigation Withdrawals Stopped
Marathi News Esakal
www.esakal.com