
वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीला कंटाळलेले वाहनचालक, पादचारी आता या मार्गावर एकेरी पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी करू लागले आहेत.
वाठार स्टेशन (जि. सातारा) : येथील वाग्देव चौक ते वाठार स्टेशन रेल्वे स्थानकादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा दररोज अस्ताव्यस्त होत असलेल्या वाहन पार्किंगमुळे वारंवार वाहतुकीत अडथळा निर्माण होत असल्याने वाहनचालकांसह पादचारी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या रस्त्यादरम्यान एकेरी पार्किंग सुरू करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
उत्तर कोरेगावमधील वाठार स्टेशन ही मुख्य बाजारपेठ आहे. तसेच या ठिकाणी पोलिस ठाणे, महाविद्यालय, हॉस्पिटल, एसटी स्टॅंड, रेल्वेस्थानक, मंडलाधिकारी कार्यालय, वन विभाग, कृषी विभाग कार्यालय, महावितरण, राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंका, सहकारी पतसंस्था, तसेच मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. त्यामुळे वाठार स्टेशन परिसरातील जाधववाडी, फडतरवाडी, विखळे, तळीये, बिचुकले, तडवळे संमत वाघोली, देऊर, दहिगाव तसेच भाडळे परिसरातील अनेक गावांतील नागरिकांची येथे सतत वर्दळ असते.
कर्ज हवयं! साताऱ्यात आज बॅंक ऑफ महाराष्ट्रने घेतलाय मेळावा
वाठार स्टेशन येथील बाजारपेठ ही पोलादपूर-पंढरपूर या राज्य मार्गावर म्हणजे मुख्य रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांचीही सतत वर्दळ सुरू असते. त्यातच या ठिकाणी येणारे ग्राहक हे आपली चारचाकी, दुचाकी वाहने ही रस्त्याच्या दुतर्फा जागा मिळेल तेथे तेथे पार्क करत असतात. त्यातूनच पादचारीही वाट काढत चालत जा-ये करत असतात. परिणामी वारंवार वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. शुक्रवारी आठवड्याच्या बाजारादिवशी तर खूप कोंडी होते. मग पादचाऱ्यांना कसरत काढत वाट काढावी लागते. या रस्त्यावर गंभीर अपघाताची शक्यताही नाकारता येणार नाही. प्रामुख्याने वाठार पोलिस ठाण्यासमोरच दुतर्फा पार्किंग होत असल्यामुळे वाठार पोलिसांनी याप्रश्न लक्ष घालणे आवश्यक आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीला कंटाळलेले वाहनचालक, पादचारी आता या मार्गावर एकेरी पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी करू लागले आहेत.
पत्नीशी भांडून आलेल्या पुण्यातील युवकाचा महाबळेश्वरच्या द-या खाे-यात शाेध सुरु
गावांचा विकास करून मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू : आमदार शिवेंद्रसिंहराजे
""वाठार स्टेशन बाजारपेठेतील रस्त्याच्या दुतर्फा अस्थाव्यस्त पार्किंग होत असल्याने वाहतुकीस वारंवार अडथळा होत आहे. तेव्हा या ठिकाणी एकेरी पार्किंग सुरू करावे.''
-प्रेमजित फडतरे, व्यापारी, वाठार स्टेशन
Edited By : Siddharth Latkar