महाबळेश्वर : पावसामुळे वेण्णा तलावातील पाणी पातळीत वाढ

महाबळेश्वर तालुक्यात सध्या पावसाने दडी मारल्याचे चित्र होते. जून महिन्यात पाऊस नसल्यामुळे सर्वत्र काळजीचे वातावरण निर्माण झाले होते.
weather update heavy rains Mahabaleshwar increase water level in Venna Lake satara
weather update heavy rains Mahabaleshwar increase water level in Venna Lake satarasakal

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे वेण्णा तलावातील पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत २७ इंच पावसाची नोंद येथे झाली आहे. सोमवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. महाबळेश्वर तालुक्यात सध्या पावसाने दडी मारल्याचे चित्र होते. जून महिन्यात पाऊस नसल्यामुळे सर्वत्र काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतीची कामे देखील खोळंबली होती. परंतू गेल्या दोन दिवसांपासून येथे पावसाची संततधार सुरू असून खऱ्या अर्थाने पावसाळा सुरू झाल्याची जाणीव होत आहे.

आंबेनळी घाट, कोट्रोशी येथील घाट तसेच केळघर घाटात दरड कोसळण्याची शक्यता पावसाळ्यात वाढते तसेच काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात दरड कोसळल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद होतात. अश्यावेळी प्रवाश्यांचे हाल होऊ नयेत व वाहतुक बंद पडू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. विज मात्र वारंवार जात असल्याने अडथळे निर्माण होत आहेत तसेच शहरातील पाणी पुरवठ्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे. अनेक वर्ष प्रलंबित असलेली भूमिगत विज वाहकाची योजना लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी तालुक्यातून जोर धरू लागली आहे. शहरात पर्यटकांची तुरळक गर्दी असून गरम गरम मका पॅटिस व कणीसाचा आस्वाद घेताना पर्यटक दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com