कऱ्हाडला एनडीआरएफचे पथक दाखल; पावसाचा जोर वाढल्याने प्रशासन अलर्ट

महापुरावेळी झालेल्या संकटाचा विचार करुन प्रशासनाने पावसाच्या सुरुवातीलाच एनडीआरएफची टीम येथे दाखल केली
weather update  NDRF squad deploy to Karhad Administration alert due to heavy rains satara
weather update NDRF squad deploy to Karhad Administration alert due to heavy rains satarasakal

कऱ्हाड : तीन दिवसापासून कऱ्हाड-पाटण (जि.सातारा) तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कृष्णा-कोयनासह अन्य नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. मागील वर्षी आलेल्या महापुरावेळी झालेल्या संकटाचा विचार करुन प्रशासनाने पावसाच्या सुरुवातीलाच एनडीआरएफची टीम येथे दाखल केली आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याती सर्व तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन व निवारण कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे. पाटण तालुक्यात पावसाचा जोर वाढल्यावर त्याचा फटका कऱ्हाड तालुक्यातील नदीकाठच्या गावांना मोठ्या प्रमाणात बसतो. मागील वर्षी तालुक्यात सलग सहा दिवस महापुराचा वेढा होता. त्यामुळे कऱ्हाड शहरासह तालुक्यातील २० हुन अधिक गावे महापुरबाधीत झाली होती.

त्यामध्ये घरांसह पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. त्याचबरोबर महापुरात अडकलेल्या नागरीकांना पाण्याबाहेर काढुन सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफचे पथकेही दाखल झाली होती. मात्र त्यातील दोन पथके पाटण तालुक्यातील भुस्खलनग्रस्त भागात रवाना करण्यात आली होती. गेल्या तीन दिवसापासुन पावसाचा जोर वाढला आहे. त्याचबरोबर जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन अलर्ट झाले असुन येथे एनडीआरएफची टीम दाखल करण्यात आली आहे. या पथकात तीन अधिकारी आणि २२ जवान आहेत. त्यांच्याकडे चार रबर बोटी, लाईफ जॅकेटस् आहेत. संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभुमीवर हे पथक सज्ज झाले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार येथील तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती निवारण कक्ष सुरु करण्यात आला आहे.

आपत्तीच्या पार्श्वभुमीवर कऱ्हाडला एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. त्याचबरोबर तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षही सुरु केला आहे. नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या दुर्घटनांबाबत माहिती देण्यासाठी ०२१६४ - २२२२१२ या क्रमांकावर नागरीकांनी संपर्क साधावा.

- उत्तमराव दिघे प्रांताधिकारी, कऱ्हाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com