esakal | बाजारात विक्रेते 'फुल्ल' पण ग्राहकच 'गुल'; मातीमोल किमतीने भाजीपाल्याची विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

Dhebewadi Market

ढेबेवाडीतील आठवडा बाजारासाठी कऱ्हाड व पाटण तालुक्यांतून ग्राहक व विक्रेते येतात.

बाजारात विक्रेते 'फुल्ल' पण ग्राहकच 'गुल'

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन (Ganeshotsav 2021) व पाऊस यामुळे काल (मंगळवार) येथील आठवडा बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने विक्रेत्यांनी अख्खा दिवस ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसून काढला. भाज्या फेकून देण्याऐवजी अगदी मातीमोल किमतीने त्यांची विक्री सुरू होती.

येथील आठवडा बाजारासाठी कऱ्हाड व पाटण तालुक्यांतून ग्राहक व विक्रेते येतात. भाजीपाला, कांदा-बटाटा,फळे, धान्य, खाद्यपदार्थ, शेळ्या, कोंबड्या, मासे आदींच्या खरेदी-विक्रीतून बाजारात मोठी उलाढाल होते. कोरोनामुळे (Coronavirus) प्रशासनाने आठवडी बाजारांवर निर्बंध घातलेले असले तरी येथे मात्र, ते झुगारून दर मंगळवारी बाजार भरतच आहे. ग्रामपंचायतीने (Gram Panchayat) पोलिस व आरोग्य विभागाच्या (Department of Health) वतीने दंडात्मक कारवाई, ऑन द स्पॉट कोरोना चाचणी व लसीकरणाच्या प्रमाणपत्र तपासणीची मोहीम राबवत बाजार रोखण्याचा प्रयत्न केलेला असला तरी त्यात यश आलेले नाही. गणेशोत्सवामुळे चाकरमानी मोठ्या संख्येने गावी आल्याने आज आठवडा बाजार चांगला भरेल, या आशेने सकाळपासून बाजारात दुकाने मांडून बसलेल्या विक्रेत्यांची निराशाच झाली.

गौरी-गणपती विसर्जन व पाऊस यामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविल्याने विक्रेत्यांनी अख्खा दिवस ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसून काढला. ग्राहक नसल्याने बाजारात भाजीपाल्याचे दर अगदीच गडगडले होते. भाज्या फेकून देण्याऐवजी अगदी मातीमोल किमतीने त्यांची विक्री सुरू होती. सायंकाळी घरी जाण्यापूर्वी अनेक विक्रेत्यांनी भाजीपाला रस्त्यावर व नाल्यात फेकून दिल्याचे दिसून आले. प्रवासाचे आणि मालाचे भाडेही निघाले नसल्याच्या प्रतिक्रिया विक्रेत्यांनी व्यक्त केल्या. आठवडा बाजाराच्या दिवशी ग्राहकांनी ओसंडणाऱ्या येथील बाजारपेठेतील स्थानिक व्यापाऱ्यांच्या दुकानांतूनही आज शुकशुकाट होता.

loading image
go to top