सातारा : मी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे समान असतात. दाभोलकर यांची अंधश्रद्धा ही केवळ हिंदूविरोधी (Hindu) होती. दाभोलकर (Narendra Dabholkar) यांची हत्या झाल्यानंतर कोणाला तरी पकडणे आवश्यक होते. त्यामुळेच विक्रम भावेंसारखे अकार्यक्षम व्यवस्थेचे बळी ठरले. दरम्यान, हिंदूंनी संघटित व्हावे, जागरूक राहावे, असे मत वीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यकारी अध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी व्यक्त केले.