
सातारा : फिटनेस प्रमाणपत्र संपलेल्या वाहनांच्या नूतनीकरणाबाबत प्रशासनातच संभ्रमावस्था आहे. त्यामुळे वाहतूकदार अडचणीत सापडले आहेत. सन २०१५ पूर्वी आणि नंतर नोंदणी केलेल्या वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणावर बंदी घातल्याने वाहतूकदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यात हजारो व्यावसायिक वाहने अडकून पडल्याने वाहतूकदारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. यावर तोडगा काढावा, अशी मागणी वाहतूकदारांनी केली आहे.
या उपकरणाच्या प्रमाणानुसार व निरीक्षणानुसार फिटनेस प्रमाणपत्राचे नूतनीकरण केले जात होते; परंतु नुकत्याच काढण्यात आलेल्या एका परिपत्रकानुसार याबाबतचा संभ्रम वाढला आहे, तसेच फिटनेस प्रमाणपत्र देणे अचानक बंद केले गेले आहे.