
कास : जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावर नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ होऊ लागला आहे. पांढऱ्या रंगाची रानहळद (चवर) पठारावर बहरली आहे. त्यांच्या जोडीला इतर फुलेही तुरळक प्रमाणात दिसू लागल्याने कासच्या फुलोत्सवाची चाहूल लागली आहे. सद्यःस्थितीत परिसरात पावसाच्या हलक्या सरी, धुके असे वातावरण आहे.