
-तानाजी पवार
वहागाव : कऱ्हाड तालुक्यातील वसंतगडाला अज्ञाताने लावलेल्या आगीत गड परिसरातील वनसंपदेचे मोठे नुकसान झाले. भरदुपारी उन्हाच्या झळा बसत असतानाच अचानक लागलेल्या आगीची माहिती समजताच परिसरातील वसंतगड प्रेमी व वनविभागाच्या सहकाऱ्यांनी आग रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना त्यात म्हणावे तेवढे यश आले नाही. परिणामी, या आगीत तळबीडपासून वसंतगड, वहागाव, वनवासमाची या परिसरातील वनसंपदेचे मोठे नुकसान झाले.