Wolf Attack : दुधेबावीत लांडग्याचा जीवघेणा हल्ला, सात जण जखमी; आरोग्य केंद्रात उपचार सुरू
Satara News : मोगराळे घाटात परिसरात शेतकरी शेताची कामे करीत असताना लांडग्याने हल्ला करून जखमी केले. त्यानंतर जखमींना तातडीने फलटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Victims of the deadly wolf attack in Dudhebavi receiving medical care at the local health center.Sakal
दुधेबावी : येथील बोरकरवाडी परिसरात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर लांडग्याने हल्ला केला. यात सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.