सातारा : कारंडवाडी (ता. सातारा) येथील वनश्री कॉलनीत राहणाऱ्या सविता गणेश मुंढे (वय ३७) या विवाहितेने मुलगी जिविका (वय १३) हिच्यासह गळफास घेऊन गुरुवारी रात्री आत्महत्या केली. याप्रकरणी गणेश ज्ञानदेव मुंढे (मूळ रा. तांदूळवाडी, ता. कोरेगाव) याला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील गणेश मुंढेला शनिवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आर्थिक विवंचना, तसेच पतीच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे.