
सातारा : येथील सेव्हन स्टार इमारतीमधील मोबाईल दुकानातून मोबाईल चोरल्याप्रकरणी एका महिलेला शहर पोलिसांनी अटक केली आहे. माधवी काशिराम राठोड (वय ५२, रा. चिमणगाव, ता. कोरेगाव) असे तिचे नाव आहे. २१ जूनला अंबिका मोबाईल दुकानातून एक मोबाईल चोरीला गेला होता. एका महिलेने दुकानातील गर्दीचा गैरफायदा घेऊन ओढणीच्या आडून मोबाईल चोरी केली असल्याबाबत मालकाने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.