ढेबेवाडी : डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली, तर पती जखमी झाला. कऱ्हाड- ढेबेवाडी रस्त्यावर गुढे ते मालदन फाट्यादरम्यान आज दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. जयश्री शशिकांत पाटील (वय ६२, रा. गुढे, ता. पाटण) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे.