परप्रांतीय अल्पवयीन विवाहितेची मेढ्यात आत्महत्या; दोन महिन्यांची होती गर्भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Crime News

परप्रांतीय 17 वर्षीय अल्पवयीन विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

परप्रांतीय अल्पवयीन विवाहितेची मेढ्यात आत्महत्या

मेढा (सातारा) : मेढा (ता. जावळी) येथे परप्रांतीय १७ वर्षीय अल्पवयीन विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही अल्पवयीन विवाहित महिला दोन महिन्यांची गरोदर होती. या प्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात (Medha Police Station) गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी महिलेच्या पतीस अटक केली आहे. महंमद आझाद जासीम (वय २२) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महमंद व आत्महत्या केलेली महिला हे दोन्ही बिहार (Bihar) राज्यातील समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. आत्महत्या केलेली महिला ही अल्पवयीन असतानाही महंमदने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या पालकांना फूस लावून पळवून नेत तिच्याशी लग्न केले. त्यानंतर वेळोवेळी तिच्याशी भांडण केले. जबरदस्तीने तिच्याशी शरीरसंबंध केले. त्यातून संबंधित महिला दोन महिन्यांची गरोदर राहिली.

हेही वाचा: शिपायाची मुलगी बनली आयएसएस अधिकारी

वारंवार होत असणाऱ्या भांडण-तंट्याच्या त्रासाला कंटाळून तिने येथील राहत्या खोलीत पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या महिलेचा भाऊ राहुल राय याने मेढा पोलिस ठाण्यात महंमद आझाद जासीम (रा. गंगोली, ता. विभूतीपूर, राज्य बिहार, सध्या रा. मेढा) यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली असून महंमदला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मेढा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Web Title: Woman Dies At Medha In Jawali Taluka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top