esakal | Thank You Doctor : बाळाचा "बोटी'त जन्म; ग्रामस्थांत आनंदाश्रू

बोलून बातमी शोधा

Thank You Doctor : बाळाचा "बोटी'त जन्म; ग्रामस्थांत आनंदाश्रू}

दरम्यान, रात्रीच्या वेळी बोट, बोटचालक उपलब्ध होणे, आरोग्य अधिकारी उपस्थित असणे या गोष्टी महत्त्वाच्या असून, हे सर्व जुळून आल्यामुळे यांच्या प्रयत्नाने कठीण प्रसंग टळला आहे.

satara
Thank You Doctor : बाळाचा "बोटी'त जन्म; ग्रामस्थांत आनंदाश्रू
sakal_logo
By
रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : अनेकदा विमान, रेल्वे, बस, रिक्षामध्ये बाळाला जन्म दिल्याचे वाचले आहे; पण जावळी तालुक्‍यातील दुर्गम अशा कांदाटी खाऱ्यातील एका मातेने असह्य वेदना सहन करून बामणोली येथे बाळाला चक्क "बोटी'त जन्म दिला.
 
कोयना जलाशयाच्या कांदाटी भागातील पिंपरी तर्फ तांब या छोट्याशा गावातील सौ. एकता जाधव यांना रविवारी (ता. 21) रात्री उशिरा प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. जवळ आरोग्य सुविधांचा अभाव असल्यामुळे त्यांना तातडीने कोयना जलाशयातून बोटीतून बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर रात्रीच्या अंधारामध्ये नातेवाइकांनी सौ. एकता यांना बोटीतून प्रवास करत बामणोली येथील जलाशयाच्या काठावर नेले. त्यांना चालणे सुद्धा अशक्‍य झाले होते. अशा वेळी त्यांच्यासमवेत आलेल्या लोकांनी बामणोली आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांना त्याची माहिती दिली.

भर रात्री डॉ. मोरे व परिचारिका पडवी, पवार हे अंधारातून मार्गक्रमण करत बोटीपर्यंत पोचल्या. अखेर सौ. एकता यांनी बोटीतच वेदना सहन करत सुखरूपपणे बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे आरोग्य केंद्रात दाखल केले. या घटनेमुळे आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवेने ग्रामस्थांत आनंदश्रू हाेते.

...अन्‌ कठीण प्रसंग टळला 

दरम्यान, रात्रीच्या वेळी बोट, बोटचालक उपलब्ध होणे, आरोग्य अधिकारी उपस्थित असणे या गोष्टी महत्त्वाच्या असून, हे सर्व जुळून आल्यामुळे यांच्या प्रयत्नाने कठीण प्रसंग ठळला आहे. त्यामुळे डॉ. मोरे यांचा सत्कार करून त्यांना एक वेतनवाढ द्यावी, अशी मागणी दलित सेना मुंबई सरचिटणीस प्रेमानंद जगताप-सायगावकर व स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. 

दुर्मिळ माऊंटन इंपेरियल पारवा आढळल्याने पक्षीप्रेमींत आनंद

आज माझा वाढदिवस! तुमच्याकडून मला हे गिफ्ट हवयं : उदयनराजे

मराठा आरक्षणाची चळवळ पुढे नेल्यानेच माझ्यावर दबाव टाकला

शिवाजी भिलारे झाले 'पुस्तकांच गाव'चे कारभारी

सिक्कीमच्या धर्तीवर पाचगणीत पार्किंग व्यवस्था करणार; खासदार श्रीनिवास पाटलांची ग्वाही

Edited By : Siddharth Latkar