डंपर-ट्रॅक्टरच्या धडकेत महिला जागीच ठार; बीडच्या तीन महिला जखमी

Satara-Lonand Highway
Satara-Lonand Highwayesakal
Summary

वाठारच्या दिशेने साताऱ्याकडे निघालेल्या दहा चाकी डंपरने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे.

शिवथर (सातारा) : सातारा-लोणंद महामार्गावर (Satara-Lonand Highway) शिवथरनजीक असलेल्या इंगवले वस्तीजवळ सकाळी नऊ वाजता डंपर व ट्रॅक्टरच्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून तीन महिला जखमी झाल्या आहेत.

वाठारच्या दिशेने साताऱ्याकडे निघालेल्या (MH42-AQ5015) दहा चाकी खडी घेऊन निघालेल्या डंपरने ट्रॅक्टर क्रमांक MH11CW7856 ला पाठीमागून जोरदार धडक दिली असून सदर ऊस तोडणीसाठी महिला कामगार घेऊन चाललेल्या ट्रॅक्टरमध्ये असणाऱ्या वंदना जालिंदर शेंडगे (वय 40 वर्ष) रा. बाभूळगाव (जि. अहमदनगर) ही महिला जागीच ठार झाली आहे. तर शालन आबासाहेब काजवे, नंदा राजू आडागळे, अंजली गायकवाड सर्व राहणार सांगवी तालुका आष्टी (जि. बीड) या जखमी झाल्या असून जखमींना उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

Satara-Lonand Highway
बँकेतील पराभवाचा गृहराज्यमंत्री नगरपंचायत निवडणुकीत बदला घेणार?

दरम्यान, या महामार्गावर असणाऱ्या तीव्र उताराला डंपर चालक डिझेल वाचवण्यासाठी ऑटऑफ मारत असल्याने संबंधित डंपरचा ब्रेक न लागल्याने पुढे चालणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली असून या वेळी डंपर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, रस्त्यावरून जात असणाऱ्या दुचाकीस्वारांनी त्याचा पाठलाग करून थांबवले. ट्रक चालक देवेंद्र कुमार, महादेव वर्मा यांस पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस कॉन्स्टेबल डफळे करीत आहेत.

Satara-Lonand Highway
बुरुज अबाधित ठेवून प्रतिष्ठेचा गड जिंकणं NCP, BJP, काँग्रेसमोर मोठं आव्हान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com