पादचारी पूल बनला तळिरामांचा अड्डा; मलकापुरात महिलांना छेडण्याचेही प्रकार

पादचारी पूल बनला तळिरामांचा अड्डा; मलकापुरात महिलांना छेडण्याचेही प्रकार

मलकापूर (जि. सातारा) : येथील पादचारी पूल हा सध्या तळिरामांचा अड्डा बनला आहे. महामार्गालगत मोकळ्या बाटल्यांसह ग्लासचे ढीग पडल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक वेळा तळिराम ये-जा करणाऱ्या महिलांची छेड काढण्याचे प्रमाण वाढलेले आहे. मलकापूर व ढेबेवाडी फाटा परिसरात महिलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या तळिरामांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 

या परिसरात अपघात कमी करण्यासाठी उड्डाण पूल, भुयारी मार्ग व पादचारी पुलाची निर्मिती केली आहे. या ठिकाणी नागरिकांची रात्रीच्या वेळेस वर्दळ तुरळक असते. त्याचा गैरफायदा घेत तळिरामांनी या ठिकाणांना दारूचा अड्डाच बनवला आहे. अगदी सुरक्षित जागेत खुल्या बारमध्ये तळिराम बिनधास्तपणे आस्वाद घेताना दिसत आहेत. त्याच ठिकाणी मोकळ्या बाटल्यांसह ग्लास टाकून निघून जातात. पुलावर व्यायामाला येणारांना त्याची साफसफाई करावी लागत आहे.

शेंद्रे ते किणी 30 गावे अपघातग्रस्त; 125 लोकांचा मृत्यू, प्राधिकरणाचे दुर्लक्ष
 
मलकापूर फाटा, कोयना वसाहतीकडे जाणारा रोड, ढेबेवाडी फाटा परिसर व आगाशिवनगरला जाणाऱ्या रोडवर दिवसभर तळिरामांनी ठिय्याच मांडलेला असतो. काही जण फुटपाथवरच पडून राहतात. या ठिकाणावरून ये-जा करताना महिलांना त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा रस्ता अडविण्याचे व महिलांचा पाठलाग करण्याचे प्रकारही या परिसरात घडले आहेत. दारूच्या नशेत तर्रर्र असणाऱ्यांना हटकताना अनेक वेळा नागरिकांना वाद घालावा लागतो. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com