
हा अपघात इतका भीषण हाेता की संबंधित महिला डंपरच्या पुढच्या चाकाखाली चिरडली गेली.
वाई (जि. सातारा) : येथील भद्रेश्वर पुलावर डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली. अलका सुरेश सोनावणे (वय 50, रा. ओझर्डे, ता. वाई) असे मृताचे नाव आहे.
त्या पतीसमवेत घरगुती साहित्य घेण्यासाठी दुचाकीवरून वाईला येत होत्या. त्यावेळी सुरूर-वाई रस्त्यावर भद्रेश्वर पुलावरून शहराकडे येताना दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली. त्यामुळे त्या दुचाकीवरून पडून डंपरच्या पुढच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पती सुरेश सोनावणे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सध्या या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे तयार झालेल्या गतिरोधकामुळे हा अपघात झाल्याचे घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
शिवेंद्रसिंहराजे बारामतीत भेटले पवारांना; नवीन राजकीय समीकरणे उदयास?
Edited By : Siddharth Latkar