esakal | धक्कादायक! पहिल्या बायकोस टीव्ही आणण्यास नेल्याने दूसरीने दिला जीव

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! पहिल्या बायकोस टीव्ही आणण्यास नेल्याने दूसरीने दिला जीव}

घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे व पोलिस निरीक्षक उमेश हजारे यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक व्ही. ए. देसाई करत आहेत.

धक्कादायक! पहिल्या बायकोस टीव्ही आणण्यास नेल्याने दूसरीने दिला जीव
sakal_logo
By
अशपाक पटेल

शिरवळ (जि. सातारा) : कवठे (ता. खंडाळा) येथील पती- पत्नीच्या वादविवादातून टीव्ही आणायला नेले नाही, म्हणून विवाहितेची (दुसऱ्या पत्नीने) आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या घटनेची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात झाली आहे. 
 
याबाबत पोलिसांनी सांगितले, की पतीने पहिल्या बायकोला टीव्ही आणायला नेल्याचा राग मनात धरून दुसऱ्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार कवठे गावच्या हद्दीत घडला आहे. ही घटना काल सकाळी सव्वाआठ ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. पार्वती दगडू फुलसुरे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
 
दगडू नरसिंग फुलसुरे (रा. आवंडा, पो. बडूर, ता. निलंगा, जि. लातूर. सध्या कवठे, ता. खंडाळा, जि. सातारा) हे मजूर असून, त्यांचे दोन विवाह झाले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव गुणबाई, तर दुसऱ्या पत्नीचे नाव पार्वती आहे. "आपल्या घरी टीव्ही आणा,' अशी दुसरी पत्नी पार्वती यांची मागणी होती. सोमवारी दगडू घरी असताना दुसरी पत्नी पार्वती हिने खुणा करून टीव्ही घेऊन या, असे सांगितले. यावर दगडू यांनी "तू लहान मुलीला घेऊन घरीच थांब. मी आणि गुणाबाई (पहिली पत्नी) टीव्ही आणायला जातो,' असे सांगितले. याचा पार्वती यांना राग आल्यामुळे भांडी, कपडे यांची आदळाआपट करत "तुम्ही गुणाबाईला घेऊन जाता. मला का घेऊन जात नाही?' असा आक्षेप घेतला. या वेळी दगडू यांनी पार्वती यांची समजूत काढली आणि ते गुणाबाई यांना घेऊन सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास शिरवळ येथे आले.
 
दरम्यान, दगडू आणि गुणाबाई टीव्ही आणण्यासाठी गेले. मात्र, मला घेऊन गेले नाहीत, याचा राग मनात धरून काल सकाळी सव्वाआठ ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती दगडू फुलसुरे यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद झाली आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे व पोलिस निरीक्षक उमेश हजारे यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक व्ही. ए. देसाई करत आहेत.

आज माझा वाढदिवस! तुमच्याकडून मला हे गिफ्ट हवयं : उदयनराजे

सोलो ट्रिपला जाताय.. मग, या खास गोष्टी नेहमी लक्षात ठेवा!

भारतीयांच्या गळ्यातील ताईत हिमा दास आता बनणार डीएसपी

सातबारा कोरा करून कुळधारक मालक घोषित करेपर्यंत आंदोलन; डॉ. भारत पाटणकरांचा निर्धार

मारिया आम्हांला माफ कर, आम्हीही सचिन तेंडूलकरला ओळखत नाही

Edited By : Siddharth Latkar