Aai Yojana : महिलांसाठीची ‘आई’ योजना अडकली सरकारी फायलीतच

‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर झाले. त्याला चार महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून फारच कमी प्रस्ताव सादर झाले आहेत.
Aai-Yojana
Aai-Yojanasakal
Updated on

सातारा - ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर झाले. त्याला चार महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून फारच कमी प्रस्ताव सादर झाले आहेत. या योजनेची जनजागृतीच न झाल्याने व राष्ट्रीयीकृत बँकांपर्यंत योजनेची माहिती पोचली नसल्याची बाब समोर आली आहे.

राज्य शासनाच्या पर्यटन विकास विभागाच्या वतीने पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता व नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी या योजनेची निर्मिती केली आहे. पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे व्यवसायासाठी नोंदणीकृत असला पाहिजे. हा व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा.

हॉटेल, रेस्टॉरंटस्‌ची मालकी ही महिलांची आणि ५० टक्के व्यवस्थापकीय इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानगी प्राप्त असावी. पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले ४१ प्रकारचे व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी पर्यटन विभाग महिलांना १५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

बँकांमार्फत उपलब्ध करून दिलेल्या या कर्जाच्या १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचे हप्ते पर्यटन संचालनालयाकडून दिले जाणार आहेत. महिला उद्योजकता विकास, पायाभूत सुविधा, पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी कस्टमाइज्ड उत्पादने वा सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास ही आई योजनेतील महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री आहे.

या धोरणांतर्गत पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी १५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, योजनेची माहिती महिलांपर्यंत पोचवण्यात अपयश आल्याचे दिसून येते.

दृष्टिक्षेपात

  • पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले ४१ प्रकारचे व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज

  • १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचे हप्ते पर्यटन संचालनालय भरणार

  • व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा

  • टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक

महिला अर्जदारांना पर्यटन संचालनालयाच्या www.maharashtratouri sm.gov.in अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. या योजनेच्या जागृतीवर भर देण्यात येणार असून, बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनाही याबाबत कळवण्यात येईल.

- शमा पवार, उपसंचालक, पर्यटन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com