
सातारा : शुद्ध पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा; शिवसेना स्टाइलने आंदोलनाचा इशारा
कोयनानगर : कोयना परिसरातील गढूळ पाण्यासाठी कोयना प्रकल्पाचा बेजबाबदार कारभारच कारणीभूत धरत त्या भागातील ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या कार्यालयावर महिलांसह शिवसेना, युवा सेनेने हंडा मोर्चा काढला. येत्या २० दिवसांत कोयना, रासाटी, हेळवाकला शुध्द पाणी द्यावे, अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.(Womens strike for pure water Shiv Sena style warning of agitation)
हेही वाचा: लोहार समाज आर्थिक दृष्ट्या अजून ही हतबल
युवा सेनेचे अध्यक्ष अजय देसाई व नरेंद्र शेलार यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. परिसरात सहा महिन्यांपासून कोयना, रासाटीत गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. कोयना प्रकल्पात जलशुद्धीकरण प्रकल्प असूनही तो कुचकामी ठरला आहे. कोयना प्रकल्पाच्या मनमानी कारभाराचा निषेध करत व अशुद्ध पाण्याला प्रकल्प कार्यालयच जबाबदार आहे, असा आरोप करत परिसरातील महिलांनी प्रकल्पाच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. त्यात शिवसेना, युवा सेनाही सहभागी झाली होती. मोर्चा मुख्य रस्त्याने प्रकल्पाच्या कार्यालयावर नेण्यात आला. तेथे युवा सेनेचे अध्यक्ष श्री. देसाई म्हणाले, ‘‘प्रकल्पाचा जलशुद्धीकरण प्रकल्प असूनही कोयना, रासाटी, हेळवाक गावांत जनतेला अशुध्द पाणीपुरवठा होत आहे. तीन गावांतील जनतेला येत्या २० दिवसांत शुध्द पाणीपुरवठा झाला नाही तर शिवसेना स्टाइलने आंदोलन करू.’’ यावेळी कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार म्हणाले, ‘‘कोयना, रासाटी, हेळवाकला शुध्द पाणीपुरवठा करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शुध्द पाणी देण्यासाठी आराखडा तयार केला आहे. तीन आठवड्यात कायमस्वरूपी शुध्द पाणीपुरवठा करण्याचे ध्येय आहे.’’(Aim for a permanent supply of pure water in three weeks)
Web Title: Womens Strike For Pure Water Shiv Sena Style Warning Of Agitation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..