
वडूज : हुतात्मा भूमीची एकी कायम ठेवण्यासाठी आपण कायम प्रयत्न केले. त्या भूमीने अपेक्षित पाठबळ दिले नाही, याची खंत वाटते. पराभव झाला म्हणून घरी बसणार नाही. अवघ्या पंधरा दिवसांत खटाव- माण तालुक्यातून आपणांस चांगले मताधिक्य मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार. आगामी काळात गावोगावच्या कार्यकर्त्यांशी संपर्क कायम ठेवून त्यांना पाठबळ देत जोमाने चळवळ उभी करणार असल्याचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी सांगितले.