

वाई : देशात जिहादी आणि देशद्रोही उजळ माथ्याने सर्वत्र फिरत आहेत. अल्पसंख्याक दहशतीखाली आणि अडचणीत असल्याचे भासवून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलिन करण्याचे काम होत आहे. याबाबत भारतीयांनी सावध भूमिका घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केले.प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने महागणपती घाटावर आयोजित शिवप्रताप दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जयराम देसाई, नियंत्रक श्रीमती विजयाताई भोसले, उपाध्यक्ष विनायक सणस, नगरसेवक महेंद्र धनवे, सतीश वैराट आदीची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. देसाई म्हणाले, ‘‘छत्रपतींच्या महाराष्ट्रातच त्यांच्या पराक्रमाचा गौरव करताना प्रशासकीय पातळीवर आचार संहिता लागू होत आहे. अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करणाऱ्या राज्यकर्त्यांमुळे इमानेइतबारे काम करणाऱ्या पोलिस प्रशासनालाही नको ती भूमिका घ्यावी लागत आहे. प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण सुरू आहे. त्या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे इतिहास पुसला जाण्याची भीती आहे.’’या वेळी यशवंत जाधव (संभाजीनगर) यांचा पोवाड्याचा कार्यक्रम झाला. किल्ला स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. अध्यक्ष गणेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. सचिव राजेंद्र सुतार, अभिजित ढगे, मिथुन कदम, अक्षय मराठे यांनी स्वागत केले. आनंद पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.